परवा नेहेमीच्या गराजला गेलो गाडी सर्विसिंगसाठी...आमचे करमरकर कुठे दिसेनात....दुस-या एकांना विचारलं अहो करमरकर आले नाही का..तर म्हणाले ते गेले "ही इज नो मोर" ...काय अहो असं अचानक काही धक्कादायक...लिवरचा कर्करोग ...दारू तर दूरच सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला माणूस...आणि कर्करोग...
गेले पंधरा वर्ष कधीहि गाडी घेऊन जा ..हसतमुखाने "मग काय भालेराव, काय दुखतय गाडीचं?", असं म्हणत ट्रायलला बसणार...सोबत फेरी मारता मारता गप्पा ....सुरुवातीला वाटयचं हा माणूस ट्रायल घेतोय कि गप्पा मारतोय मधेच सांगायचो अहो तो आवाज पहा उजवीकडून येतोय...म्हणायचे साहेब काळजी नका करू...पुन्हा गप्पा सुरू..
मात्र ट्रायल संपून परत आलो की चालता चालता हातखालच्या लोकाना सुचना.."ते एअर फिल्टर पहा...तो डावीकडे व्हील बेरिं चेक कर...वगैरे वगैरे...गाडी चालवताना नुसत्या आवजाने बिघाड सांगणारा अवलीया होता हा माणूस...
नेहेमी सांगायचे "गाडी बोलते हो ..कुठे दुखतय ते ...आपण लक्ष देऊन ऐकत नाही..." आता जेव्हा जरा आवाज बदलला की मी गराजला जातो तेव्हा करमरकर आठवतात...आणि त्यांचं ते वाक्य "गाडी बोलते हो..."
गराज म्हटलं की एका विशिष्ट प्रकारची लोक समोर येतात...त्या सगळ्य़ांत हा माणूस वेगळा...ती मुले आपापसात वाद घालू लागली कि हे येणार... शांतपणे "काय रे काय झाल?" ती मुले सुरूवातीला तावातावाने सांगणार हा कसा काम करत नाही कींवा अजून काही...तरी हा माणूस शांत..एकाला सांगणार जारे जरा पाणि पिऊन ये...तोवर दुस-याला अरे तू असं कर मग त्याला पाठवतो..असं चीडू नये तुलाच त्रास होतो जा बरं..एका मिनिटात शांतता प्रस्थापित व्हायची...आता ते नाहीत तर तिथे सकाळी मिटिंग वगैरे "वर्क एलोकेशन की काय ते"
स्वतःला केबीन असताना हा माणूस कधीही आत बसलेला पाहीला नाही...म्हणायचे फ़्लोअरवर काम करतात हे लोक आणि मी ऊंटावरून शेळ्या नाही हाकू शकत...वयाच्या पासष्टीतही दिवसभर उभे आणि फिरणारे...
मागच्या वर्षी त्याना विचारलं आता रिटायर का नाही होत तर म्हणाले "जे टायर होतात ते रिटायर होतात..आय एम नोट टायर्ड"...इथे येतो फ़िट रहातो घरी बसलो तर आजारी पडेन...माझे सारे तुमच्या सारखे मित्र पण इथेच भेटतात...घरी बसलो तर याल का मुद्दाम गप्पा मारयला?...किती मार्मिक बोलले...आज ते नाहीत तर ते कुठे रहायचे हे सुध्दा माहीत नव्हतं...इतक्या वर्षाचा त्या काही काळाचा सहवास वर्षातून काही वेळा भेट...तरीही मनात घर करून गेलेला...कर्मयोगी करमरकर...
अनेक गुरुंच्या भजनी लागूनही जी समाधी अवस्था प्राप्त होत नाही....ती शांत सन्यस्त तरीही कर्मात व्यस्त अशी भावना या माणसाला पहातना जाणवायची...कायम आठवेल एक वाक्य त्यांचं "आपण आपलं काम मन लावून प्रामाणिकपणे केलं की काय मस्तं झोप लागते हो रात्री..आणि काय हवय आयुष्यात?" खरय करमरकर साहेब लाखमोलाचं बोललात...

No comments:
Post a Comment