पदर छोटे छोटे नात्यांचे ....हळू हळू उलगडणारे....अनेक नाती जवळून
पहाता त्यांचे पोत सारखे वाटणारे....अनेकदा रंगही सारखेच....पण जातकुळी
भिन्न...जणू अनेक छोट्या रेषांच्या बनतात गोलाकार वेटोळ्या...लांब जाऊन
पाहता वाटतात त्या वलयाकार...पण जवळी येता होतात सरळ रेषा...या अशा अनियमी
नात्यांनाही असतात काही अगम्य नियम....पहावे उलगडून या वळ्यांना...सोड्वावे
पदर हलक्या हाताने...येतील हाती सुंदर अन सुरम्य चित्रे...चित्रांमध्ये
दड्लेली आणखी काही चित्रे...सारखेपणातही आपला वेगळेपणा उलगडणारी नाती...कधी
सहज वाटता वाटता गुंतून जाणारी..अन अवघड वळणांवर सहज सोपी होणारी
नाती...काळानुरूप बदलणरी प्रवाही अन तरीही आपला एक रंग अन पोत
जपणारी...एखाद्या कलाइडोस्कोप सारखी आपणच बनविलेल्या...माहीत असते आपणच
भरल्यात त्यात रंगीत काचा अन मणी...तरीही उमटणारी चित्रे किती प्रकारची,
आकारांची..काचा अन मण्यांच्या पलीकड्ची...तशीच काचा मण्यांची माणसे पण
नात्यांच्या आकार उकाराने सजली की होतात सुंदर चित्रे त्यांची...जेव्हा
evolution of curve आत्मसात करीत होतो....आली समोर evolution of relations
ची चित्रे नात्यांच्या गोलाई बरोबर...अन आहाहा... aesthetics of humans
with humans ..काय अनुभव आहे हा सौंदर्याचा मानवी नात्यंच्या
No comments:
Post a Comment