Tuesday, November 13, 2012

सूर असे कसे लागतात जाऊन.....

सूर असे कसे लागतात जाऊन

आतपर्यंतं....अगदि भिडतात काळजाला....अंगावर काटा....डोळयात आसू...गालावर
हसू...मनात नाचू... अशी विचित्र अवस्था का बरं होते...काय काय करतात हे सूर कळत
नाही...छळतात म्हणावं तर तसंही नाही...लाड करतात म्हणावं तर तेही नाही...प्रेम
करतात का तर नाही...नक्की कय करतात हे सूर ...


अगदी मनावर गारूड
करतात...गात्रागात्रामधे सूक्ष्मतीसूक्ष्म असे तरंग उमटत जातात...उमटतंच
जातात...काही सुधरत नाही..आपण वेड्यासारखे होतो...एखादा कातर स्वर काळीज कापून आर
पार जातो....मधूनचं एखादी लाडीक तान अगदी झोपाळा जोजवून जाते...एखादा करूण स्वर
पाणि नाही खळू देत डोळ्यातलं...तर एखादी आर्त तान आतूरतेच्या परिसीमेला नेऊन
पोचवते....


कधी कधी आपण आपले रहातच
नाही..होतो एक हलका हवेचा झोत...एक खळाळणारं पाणी...एक डोलणारं झाड...एक फुलांनी
डवरलेला वेल...एक धीरगंभीर पर्वत...एक नाजूक पाऊलवाट वळणावळणाची...होतो मेघ आणि
लागतो शोधू आपल्या प्रीयेला...आपण असतो अन नसतोही...


का करतात हे स्वर
आपल्यासोबत असं..का नाही सोडत एकटे आपल्याला...की त्यानाही कळतं आपण उदास असल्याचं
अन देतात ते साथ उदासीतही....


हे सूर नव्हे असतात
फुलपाखरं भोवताली रंगीत ...असतात भ्रमर गुंजन करणारे.....कधी होतात विकारी न्
विखारीही....तर कधि वैरागी निर्विकार...कधी येतात सजून धजून भेटायला प्रियाला...तर
कधी लावतात वाट पहायला प्रियेची...कधी भंगून टाकतात सारी स्वप्ने...तर कधी सांगतात
मर्म उद्याच्या भविष्याचं..


का कसे कुणास ठाऊक करतात
साथ सदैव आपली सावलीसारखी हे सूर...या त्यांच्या अशा त-हांनी आपण अचंबित होतो...कसल्याशा
सुरुवातीला कधी मध्येच तर कधी शेवटाला येतात विचारांच्या...सूर आले की विचार येतात
का विचार आले की सूर साथ देतात त्यांना हे एक कोडं आहे...अन् असली कोडी
सोडविण्याच्या भानगडीत न पडता घ्यावं त्यांना सरळ आपलसं करून...खेळवावं त्यांना...करू
द्यावं प्रेम आपल्यावर..अन् रुसूही द्यावं...कारण हे सूरच असतात आपले सांगाती...


तेच असता माय् अन्
बाप्...बंधू न् मित्र...सखी अन् प्रेयसी पण...करतात साथ घेतात हात हाती...स्पर्षून्
जातात हल्केच...अन दाखवतात सदैव वाट आयुष्यात...जाणवू लागतं कि आहेत हे आपल्या
विचारांचं प्रकटीकरण आपलंच रूप आरश्यातलं...


आयुष्यच होऊन जाईल एक ...सूरेल मैफील.....

Friday, November 9, 2012

The Karmayogi...Karmarkar कर्मयोगी करमरकर

     परवा नेहेमीच्या गराजला गेलो गाडी सर्विसिंगसाठी...आमचे करमरकर कुठे दिसेनात....दुस-या एकांना विचारलं अहो करमरकर आले नाही का..तर म्हणाले ते गेले "ही इज नो मोर" ...काय अहो असं अचानक काही धक्कादायक...लिवरचा कर्करोग ...दारू तर दूरच सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला माणूस...आणि कर्करोग...

      गेले पंधरा वर्ष कधीहि गाडी घेऊन जा ..हसतमुखाने "मग काय भालेराव, काय दुखतय गाडीचं?", असं म्हणत ट्रायलला बसणार...सोबत फेरी मारता मारता गप्पा ....सुरुवातीला वाटयचं हा माणूस ट्रायल घेतोय कि  गप्पा मारतोय मधेच सांगायचो अहो तो आवाज पहा उजवीकडून येतोय...म्हणायचे साहेब काळजी नका करू...पुन्हा गप्पा सुरू..

     मात्र ट्रायल संपून परत आलो की चालता चालता हातखालच्या लोकाना सुचना.."ते एअर फिल्टर पहा...तो डावीकडे व्हील बेरिं चेक कर...वगैरे वगैरे...गाडी चालवताना नुसत्या आवजाने बिघाड सांगणारा अवलीया होता हा माणूस...

नेहेमी सांगायचे "गाडी बोलते हो ..कुठे दुखतय ते ...आपण लक्ष देऊन ऐकत नाही..." आता जेव्हा जरा आवाज बदलला की मी गराजला जातो तेव्हा करमरकर आठवतात...आणि त्यांचं ते वाक्य "गाडी बोलते हो..."

      गराज म्हटलं की एका विशिष्ट प्रकारची लोक समोर येतात...त्या सगळ्य़ांत हा माणूस वेगळा...ती मुले आपापसात वाद घालू लागली कि हे येणार... शांतपणे "काय रे काय झाल?" ती मुले सुरूवातीला तावातावाने सांगणार हा कसा काम करत नाही कींवा अजून काही...तरी हा माणूस शांत..एकाला सांगणार जारे जरा पाणि पिऊन ये...तोवर दुस-याला अरे तू असं कर मग त्याला पाठवतो..असं चीडू नये तुलाच त्रास होतो जा बरं..एका मिनिटात शांतता प्रस्थापित व्हायची...आता ते नाहीत तर तिथे सकाळी मिटिंग वगैरे "वर्क एलोकेशन की काय ते"
     स्वतःला केबीन असताना हा माणूस कधीही आत बसलेला पाहीला नाही...म्हणायचे फ़्लोअरवर काम करतात हे लोक आणि मी ऊंटावरून शेळ्या नाही हाकू शकत...वयाच्या पासष्टीतही दिवसभर उभे आणि फिरणारे...

मागच्या वर्षी त्याना विचारलं आता रिटायर का नाही होत तर म्हणाले "जे टायर होतात ते रिटायर होतात..आय एम नोट टायर्ड"...इथे येतो फ़िट रहातो घरी बसलो तर आजारी पडेन...माझे सारे तुमच्या सारखे मित्र पण इथेच भेटतात...घरी बसलो तर याल का मुद्दाम गप्पा मारयला?...किती मार्मिक बोलले...आज ते नाहीत तर ते कुठे रहायचे हे सुध्दा माहीत नव्हतं...इतक्या वर्षाचा त्या काही काळाचा सहवास वर्षातून काही वेळा भेट...तरीही मनात घर करून गेलेला...कर्मयोगी करमरकर...

       अनेक गुरुंच्या भजनी लागूनही जी समाधी अवस्था प्राप्त होत नाही....ती शांत सन्यस्त तरीही कर्मात व्यस्त अशी भावना या माणसाला पहातना जाणवायची...कायम आठवेल एक वाक्य त्यांचं "आपण आपलं काम मन लावून प्रामाणिकपणे केलं की काय मस्तं झोप लागते हो रात्री..आणि काय हवय आयुष्यात?" खरय करमरकर साहेब लाखमोलाचं बोललात...

Sunday, November 4, 2012

evolution of relations

पदर छोटे छोटे नात्यांचे ....हळू हळू उलगडणारे....अनेक नाती जवळून पहाता त्यांचे पोत सारखे वाटणारे....अनेकदा रंगही सारखेच....पण जातकुळी भिन्न...जणू अनेक छोट्या रेषांच्या बनतात गोलाकार वेटोळ्या...लांब जाऊन पाहता वाटतात त्या वलयाकार...पण जवळी येता होतात सरळ रेषा...या अशा अनियमी नात्यांनाही असतात काही अगम्य नियम....पहावे उलगडून या वळ्यांना...सोड्वावे पदर हलक्या हाताने...येतील हाती सुंदर अन सुरम्य चित्रे...चित्रांमध्ये दड्लेली आणखी काही चित्रे...सारखेपणातही आपला वेगळेपणा उलगडणारी नाती...कधी सहज वाटता वाटता गुंतून जाणारी..अन अवघड वळणांवर सहज सोपी होणारी नाती...काळानुरूप बदलणरी प्रवाही अन तरीही आपला एक रंग अन पोत जपणारी...एखाद्या कलाइडोस्कोप सारखी आपणच बनविलेल्या...माहीत असते आपणच भरल्यात त्यात रंगीत काचा अन मणी...तरीही उमटणारी चित्रे किती प्रकारची, आकारांची..काचा अन मण्यांच्या पलीकड्ची...तशीच काचा मण्यांची माणसे पण नात्यांच्या आकार उकाराने सजली की होतात सुंदर चित्रे त्यांची...जेव्हा evolution of curve आत्मसात करीत होतो....आली समोर evolution of relations ची चित्रे नात्यांच्या गोलाई बरोबर...अन आहाहा... aesthetics of humans with humans ..काय अनुभव आहे हा सौंदर्याचा मानवी नात्यंच्या

सम तेच भिन्न तेच काय हे कळेना..


अंड्याची आळी...आणी त्यातून कोषात जाणे....त्याचे पुढे हळूहळू पाय सोंड पंखात रुपांतर....प्रक्रीया एकच पण नशीब मात्र वेगवेगळे असू शकते...जीवनच्या अशाच सारख्या वाटना-या प्रक्रीयेतून जाताना आयुष्यात अनुभव मात्र भिन्न असतात...कारण निसर्ग....त्याचे चक्र म्हणा...किंवा आधीच ठरलेले संचित म्हणा...एकसारखी प्रक्रीया...एक्सारखेच टप्पे...मात्र अंत वेगवेगळे...तेच सहा पाय तीच सोंड तेच तसेच पंख...एक मात्र रंगांच्या दुनियेत तर दुसरा रक्ताच्या.....रस तर दोघेही शोषतात...परजीवी दोघेही....किंचित आयुष्यच वाट्याला दोहोंच्याही....दोघांचेही झळकतात प्रोफाईल पिक्स....एक मात्र सतत स्वप्न प्रेम कविता कथा यांचा सांगाती...तर दुसरा दुःख वेदना अभ्यास लेख यांचा सोबती...एकाला मरणानंतरही स्थान काचेच्या पेट्यांमधे....दुसरा यादुनियेतच नसावा अशा तजविजीत सारी दुनिया...वस्तुतः दोघेही शोषतात रक्तच...कोणी लाल तर कोणी दुस-या रंगांच....या अशा दोन्ही भूमिका येतात आपल्याही वाट्याला आलटून पालटून....कधी असतो आपण उडणारे रंगीत पुलपाखरू मोहक अन हवेहवेसे....तर कधी होतो बोचरा डास डसणरा रक्त शोषणारा ....आहेत अशा या दोन्ही स्थिती समान...पण डासांवर का कुणी कधी कविता केलीये...छान डास असे कोणी कधी म्हटल्याचे स्मरत नाही...जीवनप्रक्रीया आणि त्यातून होणारे स्रुजन किती सारखे तरी कीती भिन्न.....असेलही चुकत दिशा विचारांची...तरी क्षणात फुलपाखाराचा डास अन डासचं फुलपाखरू होतोच ना आपण...जगताना हे आंदोलीत असतोच ना...डास असतान फुलपाखरी क्षण देतात धीर पुन्हा रंगून जाण्यासाठी...अन फुलपाखाराच्या दिवसात डासमय गुंजन कानात ठेवत भान....morphogenesis of life n forms...चा विचार येऊन थबकला सारख्या तरीही भिन्न आयुष्यांवर दोन जिवांच्या आणि त्याच आयुष्याच्या अनुभूतीवर आपल्याच...अन कदाचीत तुमच्याही....cross..alter..morphogenesis..of..human mind..may be...धांडॊळा.....(एक शोध...)

धांडॊळा.....(एक शोध...)


जगाची निर्मिती कशी झाली ...ब्रह्माच्या उच्छ्वासाने...कि big bang...god particle वगैरे...पण एक मात्र खरे की छोट्या छोट्य़ा सामुहांचा तसाच दिसणारा मोठा समूह...अजून मोठा समूह...असे अनेक आकार त्यातून बनलाय विश्वाकार....आकाराने एकमेकात चपखल बसणारे आणि तसेच अनेक समूह...वाळू...छोटे गोटे...दगड...टेकड्या व डोंगर...अकार मात्र सारखेच...पाने..त्यांचा समूह...फांद्या...अनेक फांद्या ...झाडे...अनेक झाडे...अकार सारखेच...पाण्याचा तुषार..थेंब..धार..झरा..ओढा ते समुद्र...तुषारांचा आकार सारखाच....अणु ते ब्रह्मांडापर्यंत आकार....याच आकारांचा शोध...त्याचाच परीपाक .....त्याचाच मागोवा...धांडोळा...

एखाद्या आनंदच्या क्षणाचे लहानसे हिरवे पान..अशा पानांचे एकत्रीत झालेले आनंदाच्या फांदीचे रूप अन..अशा अनेक फांद्यांचे बनलेले आनंदाचे झाड...अशा अनेक झाडांचे एक आनंदवन...सगळ्या छोट्या मोठ्या आनंदाचे आकार मात्र सारखेच........एखादा छोटा दुःखाचा खडा बोचतो..अशाच खड्यांचे दगड..अन अनेक दगडांचे डोंगराएवढे मोठे दुःख...सगळ्या दुःखांचेही आकार प्रकार सारखेच....एक तुषार येतो गारवा होऊन प्रेमाचा..अशाच प्रेमतुषारांचे थेंब सुखावतात...अन अशाच थेंबांचा प्रेमसागर शांत अमर्याद...प्रेमाचेही आकार रंग सारखेच...जसे निसर्गाचे तसेच आयुष्याचे चित्र...दुःखाच्या डोंगरावर डोलणारी आनंदाची झाडे अन त्यातून अविरत वाहणारे प्रेमझरे जाऊन मिळणारे सागराला...छोट्यात छोटे ते मोठ्यात मोठे..fractals of life and nature...

पदर छोटे छोटे नात्यांचे ....हळू हळू उलगडणारे....अनेक नाती जवळून पहाता त्यांचे पोत सारखे वाटणारे....अनेकदा रंगही सारखेच....पण जातकुळी भिन्न...जणू अनेक छोट्या रेषांच्या बनतात गोलाकार वेटोळ्या...लांब जाऊन पाहता वाटतात त्या वलयाकार...पण जवळी येता होतात सरळ रेषा...या अशा अनियमी नात्यांनाही असतात काही अगम्य नियम....पहावे उलगडून या वळ्यांना...सोड्वावे पदर हलक्या हाताने...येतील हाती सुंदर अन सुरम्य चित्रे
...चित्रांमध्ये दड्लेली आणखी काही चित्रे...सारखेपणातही आपला वेगळेपणा उलगडणारी नाती...कधी सहज वाटता वाटता गुंतून जाणारी..अन अवघड वळणांवर सहज सोपी होणारी नाती...काळानुरूप बदलणरी प्रवाही अन तरीही आपला एक रंग अन पोत जपणारी...एखाद्या कलाइडोस्कोप सारखी आपणच बनविलेल्या...माहीत असते आपणच भरल्यात त्यात रंगीत काचा अन मणी...तरीही उमटणारी चित्रे किती प्रकारची, आकारांची..काचा अन मण्यांच्या पलीकड्ची...तशीच काचा मण्यांची माणसे पण नात्यांच्या आकार उकाराने सजली की होतात सुंदर चित्रे त्यांची...जेव्हा evolution of curve आत्मसात करीत होतो....आली समोर evolution of relations ची चित्रे नात्यांच्या गोलाई बरोबर...अन आहाहा... aesthetics of humans with humans ..काय अनुभव आहे हा सौंदर्याचा मानवी नात्यंच्या