Wednesday, February 26, 2014

आज फार दिवसांनी लिहायला बसलोय...मधल्या काळात एक मोठ्ठा महोत्सव अनुभवला ...अगदी आतून कारण आयोजनाचा भाग होतो..
उपवन महोत्सव...एक आगळा जीवनानुभव ....माणसे समजायची असतील त्यांच्या असलेल्या चेहेर्या पलीकडे तर असे उत्सव एक अतिशय योग्य जागा होती असे वाटले...
दोन महिन्यात असलेली नाती नसणे आणि नसलेली नाती निर्माण होणे...काही नात्यांच्या छटाच बदलून जाणे...असे काहिसे झाले ...
व्यक्तीविशेष महत्वाचे नाहीत ...वृत्ती कळाल्या ...आकृती ..प्रकृती आणि विकृती ..
या सा-याचा प्रत्यय आला...
दिवस रात्रीचे भान नसलेल्या बेभान झोकून दिलेल्या..
आपण प्रत्येक ठिकाणी कसे दिसू याचेच फक्त भान ठेवत कामाच्या वेळी नाहीसे होणा-या ...
आपल्या एरवीच्या जीवनात आपले हरवलेले स्वत्व या जागी शोधू पहाणा-या ...
आणि ते गावसताच हरखून जाणा-या....
इथल्या गर्दीत केवळ स्वत:ला हरवून काही शांत क्षण अनुभवणा-या ...
काही चाचपणा-या ...काही हाती लागते का याचा धांडोळा घेणा-या..
काही फक्त आणि फक्त देणा-या दोहो हाताने भरभरून..
काही आतल्या आत अत्यंत वेदनेचा एक वाहता झरा पण वरून त्याचेच मंजूळ संगीत साकारणा-या..
काही आतूनच आनंदी...काही अलिप्त...काही विक्षिप्त...
एक ना अनेक..अशा सा-या अनेकविध रंग पोत असलेल्या धाग्यांची जमावाट...
त्यातला मीही एक...का आलो ...कसा इथलाच झालो ...कळालेच नाही..

किती प्रसंग ...किती आनंद ...खेद ...दु:ख ...काय न काय...

या सा-या कडे मागे वळून पहाताना एक वेगळाच भाव मनात...
किती मित्र मैत्रीणी दिल्या या दोन महिन्यांनी
किती नवे विचार...किती नव्या दिशांची ओळख...

काय अमुलाग्र बदल आयुष्यात एका फक्त एका घटनेनी..
असा कसं होऊ शकतं ...पण झालय खरं...

काही व्यक्ती...काही प्रसंग ...असे घर करून राहिलेत मनात...
कित्येक जणांशी एकेकट्याने बोलाल्यावर अनेक कोडी उलागडली..आणि काही नवी कोडी पडली सुध्दा...

या सा-या मित्रांबरोबरच विशेष लक्षात राहिलेली काही माणसे...ज्यांच नाव गाव नाही माहित ...
एक चहावाला जो मी कधीही पोचलो तरी भेटलाच ...आजही भेटतो...
एक आजी जी निर्वासित झाली उत्सवामुळे...ते मंदिरातील हसरे गुरुजी...अबोल मूक साक्षीदार...
ती एकदा सकाळीच आलेली एक काकू जी तीकिटे घेउन एक तास गप्पा मारून गेली...
तो व्होल्तासाच्या नो एन्ट्री गेटवरील दिवसपाळीचा वॉचमन..
ते युथ स्टेजसमोर बसलेले आजोबा...
ती स्वताच्या अंगावर चित्रकारी करू देणारी ...गीवन माय ओन बॉडी फॉर फेस्टीवलं असं सांगणारी...
ते दिवसभर परिसर स्वच्छ ठेवणारे दोन तरूण ...येता जाता काय वेड्याचा बाजार आहे ..असं म्हणणारे...
तो सुतार त्या एन चा काम करणारा...त्याला विजेचे कनेक्शन दिले म्हणून शंभर वेळा थेन्कू साब करणारा...
एक ना अनेक...
किती तरी धागे...
काही मनं जुळलेले...काही हिशोबी.. काही विस्कटलेले ...काही गुंतलेले ...अनेक धागे आलेत सोबतीला..
वीण घालायाची ...सुरेख चित्र बनेल की एखादे...
...

आज इतकेच...आता नवी दिशा काय घेऊन येते पाहूया...

२७.०२.२०१४

 

No comments:

Post a Comment