आसोशी...
नित्य नवी तरिही जुनी कसलीही आसोशी..
विझल्यावर पेटण्याची का असते आसोशी..
दूर अंतर मिटण्याची का असते आसोशी...
नाकळून कळण्याची अन तरीही आसोशी..
उंच उंच झेपावत उडण्याची आसोशी..
अंतरीचा गूढ तळही गाठण्याची आसोशी..
काळोखातील चमकत्या काजव्याची आसोशी..
तप्त अशा ग्रीष्मातील गारव्याची आसोशी..
मंद धुंद फुलांच्या गंधाची आसोशी...
आसमंत व्यापणा-या रंगांची आसोशी..
अंगांगी मोहरत्या स्पर्शाची आसोशी..
आसुसल्या भावपूर्ण आशांची आसोशी..
नित्य नवी तरीही जुनी कसलीशी आसोशी.....
श्री....
नित्य नवी तरिही जुनी कसलीही आसोशी..
विझल्यावर पेटण्याची का असते आसोशी..
दूर अंतर मिटण्याची का असते आसोशी...
नाकळून कळण्याची अन तरीही आसोशी..
उंच उंच झेपावत उडण्याची आसोशी..
अंतरीचा गूढ तळही गाठण्याची आसोशी..
काळोखातील चमकत्या काजव्याची आसोशी..
तप्त अशा ग्रीष्मातील गारव्याची आसोशी..
मंद धुंद फुलांच्या गंधाची आसोशी...
आसमंत व्यापणा-या रंगांची आसोशी..
अंगांगी मोहरत्या स्पर्शाची आसोशी..
आसुसल्या भावपूर्ण आशांची आसोशी..
नित्य नवी तरीही जुनी कसलीशी आसोशी.....
श्री....
No comments:
Post a Comment