मन जिंकणारे अजित.....
आज बारा दिवस झाले ...ती बातमी ऐकून ....अजित नातू नो मोर...
एक अफाट व्यक्तिमत्व....
डॉ. अजित नातू.....उत्साहाचा सळसळता झरा....लाईव्ह वायर म्हणतात नं ते काय असतं ते यांना भेटल्यावर समजलं....१९९८ पासून कायम या ना त्या कारणाने या माणसाशी माझा संबंध आला...पहिल्या भेटीतच काही माणसे भावतात मनाला ...अजित नातू त्यातलेच...
व्यावसायीक कामासाठी गेलो आणि जणू मित्रच झालो...काही व्यक्ती ह्या तुमच्या मित्र असतात...स्वरूप मात्र फार वेगळे....
हा माणूसच खास होता...कुठल्याही वेळी आणि कुठल्याही प्रसंगी याला मी डोकं धरून बसलेला पाहीला नाही...
त्यांच्याकडे कायम प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असायचं.....मुळात हुशार आणि अभ्यासू...म्हणजे अगदी शब्दशः स्कॉलर....शाळेपासून ते पदव्युत्तर पर्यंत फक्त गोल्डच .त्यांची एक बहीण मागे म्हणाली होती...अजितची आठवण म्हणजे दरवर्षी पेढे मिळायचे कारण ती कशात न कशात पहिला आलेला असायचा..
पण हि अजित नातू या माणसाची खरी ओळख नव्हती
एक माणूस म्हणून खूप वेगळ्याच उंचीवर पोचलेला माणूस....
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...या ओळी जगणारा हा माणूस....
अतिशय कसबी शल्यविशारद ...शस्त्रक्रिया करताना हाडाशी संबंधीत विषय "हाडाचा डॉक्टर" हे विशेषण अगदी दोन्ही अर्थाने लागू....समाजाची सेवा आपल्याकडे असलेल्या कौशल्यातून उत्तमपणे करता येते हे अजित नातू अव्याहत करत ....
मधूनच कधी काही कामाने त्यांची भेट घ्यायला गेलं की अनेक विषयावर गप्पा होत ....त्यातून प्रेत्यक वेळी त्यंचे मोठेपण जाणवत असे....आपण काही मोठं काम करतोय असा आव मात्र कधीच त्यांच्या बोलण्यात नसे...
गमतीने म्हणायचे कि जसे तुमचा सुतार लाकडाचे काम करतो ...तसे अम्ही सुतारकाम करतो हाडाचं....
कोणालाही गरज नसताना कोणतेच औषध वा उपचार सांगत नसत.....व्यायाम करा हा त्यांचा पहिला मंत्र असे....अति स्पष्टपणा होता त्यांच्या बोलण्यात ....."काही जास्त नाहिये थोड्या दिवसात धावायला लागल"
"उगाच जास्त औषध घेऊन कशाला साईड इफेक्ट" "पैसे जास्त झालेत का सगळ्या टेस्ट करायला" "इथे चिकन बिर्याणी मागवायला हे काही हॉटेल नाही हॉस्पिटल आहे" "व्यायाम करायला नको मग येतात पाठ दुखते , गुडघे दुखतात करत"
अशी प्रेमळ दटावणीची वाक्य कानी पडत कायम त्यांच्या केबिन मध्ये बसलेलो असताना...
अनेक गरीब लोकांचे उपचार अगदी फुकट करता करता त्यांनी एक ट्रस्ट केला आणि अनेक गरजूना मदत केली..पुन्हा आजकालच्या जाहिरातबाजीच्या जमान्यात कोणताही गाजावाजा न करता काम करीत राहिले...
हे करीत असतानाच धावणे ही त्यांची आवड होती ...मॅरेथॉन मध्ये दरवर्षी सहभागी होत....शारीरक तंदुरुस्ती हा अनेकांचा दुस-याना सल्ला देण्याचा विषय असतो ...अजित मात्र आधी केले मग सांगितले असे होते...स्वतः अतिशय फीट होते..माझा घरातील अनेक लोकांच्या शस्त्रक्रिया अजित यांनी केल्या...
त्यांचे हॉस्पिटल मी डीझीईन केले होते....माझे क्ल्यायंट...आमचे डॉक्टर ....आणि त्याही पेक्षा एक मित्र अशा अनेक स्वरूपात त्याची भेट होत गेली...
अजित यांच्या आठवणी अनेक येताहेत....त्यांना कर्करोग झालाय हे समजल तेव्हा आधी विश्वास नव्हता बसला...त्याना त्या अवस्थेत भेटायला जाण्याची हिम्मत नाही झाली...आणि शेवटी मागील सोमवारी ते नसल्याची बातमी कळली ...एकोणपन्नास हे काही कोणी जाण्याचं वय नव्हे...
माझा बाबांची दोनही गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया त्यांनी केली होती...बाबा म्हणाले "ज्यांनी मला परत उभं केलं तेच राहिले नाहित रे"..
कोणताही नातं नसताना सगळ्या घराच्या डोळ्या पाणी आलं या माणसाच्या जाण्याने हो...
अजित नातू... अजून एक मित्र हरपला...
No comments:
Post a Comment